लोणार:तालुक्यातील बहुतांश गावात दुपारी मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आला होता सावरगाव तेली येथे जोरदार पाऊस पडल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहत होते त्यामुळे गावाचा संपर्क काही तासांसाठी तुटलेला होता त्यामुळे शेतात काम करणारे मजूर व शाळेतील विद्यार्थी पुलावर अडकून पडले होते सावरगाव तेली येथिल पुल हा लहान असल्याने अनेकदा हा पुल पाण्याखाली गेलेला आहे अनेक वर्षांपासून नविन पुलाची मागणी गावकरी करीत आहेत मात्र अजुन पर्यंत पुलं झालेला नाही पुल देता का पुल अशी म्हणण्याची वेळ सावरगाव तेली येथिल नागरिकांवर आलेली आहे त्यामुळे गावकरी संतप्त झाल्याचे दिसून येते आहेत
