लोणार : दारूसाठी पैसे मागून सतत आईला मारहाण करत असल्याने मुलानेच पित्याची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना लोणार तालुक्यातील पहूर येथे 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामजी मारोती मारकड ( 55 ) असे हत्या झालेल्या पित्याचे नाव असून विठ्ठल रामजी मारकड असे आरोपी युवकाचे नाव आहे.रामजी मारकड हे द्वारकाबाई हिला दारू पिऊन मारहाण करून त्रास देत होते.काल सायंकाळीही द्वारकाबाईंना मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याची गहूपोत दारू पिण्यासाठी रामजी घेऊन गेला होता.ही माहिती द्वारकाबाईने विठ्ठलला दिली.त्यामुळे संतप्त झालेल्या विठ्ठलने वडिलांचा शोध घेऊन त्यांना गाठले आणि मारहाण करायला सुरुवात केली. रागाच्या भरातच त्याने वडिलांना पाठीत काठीने बेदम मारहाण केली व नंतर गळा दाबून त्यांची हत्या केली.या प्रकरणात विठ्ठलची बहीण गंगासागर कुंडलिक जुमडे रा.जांभरूण जि . हिंगोली हिने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली . त्यावरून पोलिसांनी विठ्ठल विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रवींद्र देशमुख करत आहे.
previous post