मुलीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या आईचा मृत्यू….
खामगाव तालुक्यातील कोटी येथील शेतातील विहिरीमध्ये पाणी काढतांना तोल गेल्याने मुलगी विहिरीत पडली. दरम्यान क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली. परंतु दुर्दैवाने खोल तळाशी जाऊन अडकल्यामुळे या घटनेत आईचा दुर्देवी मृत्यू झाला.तर मुलगी सुदैवाने वाचली. ही घटना तालुक्यातील कोंटी येथे काल सायंकाळी घडली.बेबीबाई उमा खताळ (४०) असे मृत आईचे नाव आहे.मुलीला घेऊन काल सकाळी शेतात गेल्या होत्या.दरम्यान कु. आकांक्षा ही विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली.मुलगी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच आई बेबीबाईने मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केले कुठलाही विचार न करता क्षणार्धात मायेचा पाझर फुटला तीने थेट विहिरीत उडी घेतली. पाणी खोल असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी गेल्या व यात त्यांचा बुडून मृत्यू झाला दरम्यान मुलगी आकांशाने विहिरीतील पाली पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.