लोणार : लोणार तालूक्यातील भूमराळा येथील आदर्श गाव ग्राम कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मुकूंदराव टेकाळे यांची कन्या वैष्णवी व रामदास सवडे व नामखेडा ता जाफराबाद यांचे चिरंजीव शरद सवडे यांचा आज दि १७ मे रोजी कोरोना महामारी संसर्गामध्ये योध्दा म्हणून कार्य करणाऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला २१ हजार रु. चा चेक देवून आदर्श विवाह सोहळा पार पडला.
देशात कोरोना महामारी संकटाने धूमाकूळ घातला असून यामध्ये प्रशासनाचे आरोग्य विभाग, महसूल विभाग व पोलीस विभाग हे योध्दा म्हणून गेल्या दोन महीन्यामध्ये रस्त्यावर उतरून कुटुंबाचा विचार न करता कोरोना विरूध्द रात्रंदिवस लढत आहे. अशा योद्यांप्रती सामाजीक दायीत्व निभवण्यासाठी चि सौ का वैष्णवीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करून नोखा आदर्श विवाह केला असून या संकटावर मात करण्यासाठी समाजातील दात्यांनी पुढे येवून जास्तीत जास्त मदत करून कोरोना हटवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.
तसेच यावेळी वधू, वरांनी मास्क लावून सोशल डिस्टंस पाळत विवाह करून घरी राहा सुरक्षीत राहा, मास्क लावा स्वच्छता राखा व विवाहसंबंधीचे प्रशासनाचे सर्व नियम काटेकोर पाळून प्रशासनास सहकार्य करावे अशा प्रकारची जनजागुती केली. यावेळी वधू व वरांनी मुख्यमंत्री सहायता निधीला एकवीस हजार रुपये ची आर्थिक मदत बिबी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहमद सादीक पो हे का रमेश काळे व मंडळ अधिकारी विलास नागरे यांच्या कडे चेक सुपुर्द केला यावेळी वर वधू कडील मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.