मुंबई : महाराष्ट्रावरील कोरोना महामारीचे संकट अद्याप कायम आहे. विरोधकांकडून यावरून सातत्याने महाविकास आघाडी सरकावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नसल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. आता आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन बाहेर निवेदन चिटकवत निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी कॅबिनचा चेहरा पाहिला नाही, कॅबिनेने कधी मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहिला नाही’, असे म्हणत बडनेरा येथील स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिन बाहेर थेट मागण्यांचे निवेदनच चिटकवले. मुख्यमंत्री गेल्या १५ महिन्यांपासून मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासमोर समस्या मांडायच्या कशा ? लोकप्रतिनिधींनी काय करायचे ?, अशी टीका देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. रवी राणा यांनी दिलेल्या निवेदनात काही मागण्या केल्या आहेत. त्यांनी कोरोनारुग्णांवर मोफत उपचार, प्रत्येक जिल्ह्यात हजार बेड्सचे जम्बो रुग्णालय उभारावे, लसीकरण घरोघरी जाऊन करावे, कृषि बिल आणि वीज बिलात सवलत अशा विविध मागण्या त्यांनी केले आहे. निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्रीच भेटत नसल्याने त्यांनी अखेर कॅबिन बाहेर निवेदन चिटकत वेगळ्या पद्धतीने निषेधच नोंदवला.
previous post