सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे मुंबई वरून आलेल्या एका कुटुंबातील आठ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव आढळून आली आहे. त्यामुळे मलकापूर पांग्रा गट ग्रामपंचायत मधील पांगरा हे गाव सील करण्यात आले आहे व त्या मुलीचे संपर्कात आलेल्या २१ जणांना कोरं टाईम करण्यात येऊन त्यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. कोरोना संसर्ग झालेली मुलगी किडनीच्या आजाराने ग्रस्त असून १३ मे रोजी या मुलीसह तिचे कुटुंब हे मुंबईतील मोठ्या रुग्णालयातून मलकापूर पांग्रा या त्यांच्या गावी पोहचले होते. ११ मे रोजी आजारी मुलगी उपचार घेत असलेल्या रुग्णालयात तिचा स्वेब नमुने घेण्यात आला होता. दरम्यान अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली होती. संबंधित रुग्णालयाकडून बुलडाणा जिल्ह्याला याबाबतीत माहिती देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सध्या मलकापूर पांगरा गाव सील करण्यात आले असून परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. मलकापूर पांग्रा ही गट ग्रामपंचायत असून पांगरा गावाची लोकसंख्या सुमारे २५६४ च्या आसपास आहे त्यामुळे हे क्षेत्र आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून ४९६ घरातील नागरिकांचे आगामी १४ दिवस १० आरोग्य पथकाद्वारे नियमित तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान करून संसर्ग झालेली मुलगी व तिच्या कुटुंबीयांना बुलडाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे, तसेच मलकापूर पांग्रा येथील या मुलीच्या व तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेले १९ जणांवर व पळसखेड झाल्टा येथील २ जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले आहे.