वाहनाला स्टीकर लावून स्वत:पासून सुरू केली जनजागृती
बुलडाणा : माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत कोविडपासून बचावासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी मास्क नाही, प्रवेश नाही संदेश असणारा स्टीकर प्रकाशित करण्यात आले आहे. सदर स्टीकर आपल्या वाहनाला लावून राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जनजागृती सुरूपात स्वत:पासून केली आहे. कोविडपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टसिंग या त्रिसुत्रींचा उपयोग करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले आहे.
कोविडच्या काळात सतत विविध माध्यमातून शासन जनजागृती करीत आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम त्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कोविडची जनजागृती करण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: पासून सुरूवात करीत नागरिकांनी स्वत:चे व कुटूंबाचे रक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.