खामगांव : माळी सेवा मंडळ खामगाव द्वारा आयोजित माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन, शेगांव,जि बुलडाणा, वर्ष 27 वे च्या नियोजनाची सभा दिनांक 30 ऑक्टोंबर 2020 रोजी माळी भवन खामगाव येथे संपन्न झाली.सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार श्री कृष्णराव इंगळे यांच्या समवेत प्रा हरिभाऊ इंगळे,मागील वर्षी चे अध्यक्ष पांडुरंग बोदडे, अँड.शंकरराव वानखडे,तुकाराम निखाडे, बाळासाहेब बगाडे, रघुनाथ चोपडे,सदानंद खंडारे, दिनेश तायडे, बंडूभाऊ इंगळे, संजय वानखडे, राजेंद्र बोचरे, प्रल्हाद सातव,श्रीकृष्ण बोळे,शरदचंद्र गायकी,अविनाश उमरकर, रामेश्वर बंड उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रल्हाद भाऊ बगाडे हे होते.माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन हे येणारे 27 वे संमेलन जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ असून संमेलनाचे अध्यक्ष पदी अँड.श्रीकांतजी तायडे तर कार्याध्यक्ष पदी पत्रकार गजाननजी राऊत यांनी सर्व संमतीने निवड करण्यात आली.या वेळी मागील वर्षी च्या अहवाल व जमा खर्चाचे वाचन करून मान्यवरांचे उचित मार्गदर्शन झाले.

सभेचे संचालन प्रदीप सातव, प्रस्ताविक विजय राखोंडे तर आभार प्रदर्शन विनायक जुमळे यांनी केले.यासभेसाठी जिल्ह्यातील समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.या सभेसाठी अजय तायडे,उल्हास क्षीरसागर,संतोष निलखन,अरविंद बोचरे,राजेंद्र भोपळे,दयाराम वानखडे,विजय भोपळे, सदाशिव राऊत,विजय वावगे,श्रीकृष्ण खंडारे, विकास बगाडे,अमोल चरखे,अनंत सातव,विशाल बोचरे,आदींनी परिश्रम घेतले