बुलडाणा:मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे दि २९ मे रोजी माळी महा संघाचे महासंपर्क अभियान रामकृष्ण चोपडे यांचे अध्यक्षते खाली मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन अविनाश दादा ठाकरे माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष ओबिसी महामंडळ महाराष्ट्र यांनी मार्गदर्श केले.यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष यांनी समाजाची संघटनात्मक गरज समजाऊन सांगत माळी समाजाने आपले न्याय हक्कासाठी जागृत राहण्याचे आव्हान केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्षअरुणजी तिखे,डॉ भास्करराव चरखे,गोपाळराव के.तायडे -जिल्हा अध्यक्ष माळी महासंघ बुलडाणा उल्हास वानखडे राजेंद्र बोचरे, भगवान चोपडे,रामदास भोपळे मनोज बगाडे, ता.अध्यक्ष मलकापूर निवृत्ती इंगळे नांदुरा श्रीकृष्ण तायडे, किशोर राऊत शहर अध्यक्ष मलकापूर,संतोष बोंबटकार प्रा.नितीन भुजबळ, यांचे सह प्रमुख माळी महासंघ पदाधिकारी व मोठ्या संखेने समाज बांधव ऊपस्थीत होते.या कार्यक्रमात जिल्हा प्रसिद्धि प्रमुख म्हणुन हरी जुमडे यांची तर नांदुरा तालुका कार्याध्यक्ष पदी सुभाषराव गवळी यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष गोपाळराव तायडे यांनी दिली आहे
previous post