खामगांवचा ज्ञानेश्वर खेडकर यांचा अपघातात मृत्यू
अकोला : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते म्हैसाग मार्गावर कट्यार बस थांब्यानजीक मालवाहू पिकअप गाडी व कारचा अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना शनीवारी दुपारी घडली. मृतकांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश आहे पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोलाकडून म्हैसांगकडे सिलेंडर वाहून नेणारे मालवाहू पिक अप वाहन एम एच-३०-बी डी- ०३४५ व दर्यापूरकडून अकोला कडे जाणारी कार क्र. एम एच-३८- ५७२७ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारचा चालक ज्ञानेश्वर रवींद्र खेडकर (२९, खामगाव) जागीच मृत्यू झाला. तर प्रवासी जागृत मोमाया,स्नेहा हे दोघे गंभीर जखमी झाले, पिकअप गाडीचा चालक अब्दुल जुबेर अब्दुल शरीफ (३२, रा. दहीहांडा) याचाही मृत्यू झाला. ज्ञानेश्वर खेडकर यांचे खामगाव अर्बन बँक जवळ चहा व नाश्त्याचे हॉटेल आहे. सोमवार ते शुक्रवार तो आपल्या वडिलांसोबत हॉटेलवरील कामात मदत करत होता. व शनिवार रविवार यादिवशी तो गाडीवर ट्रिप मारत होता.

त्याचे वडील ह भ प रवींद्र खेळकर हे कीर्तन व प्रवचनाचे काम सुद्धा करायचे. ज्ञानेश्वरीचा स्वभाव हा मनमिळावू असल्याने तो प्रत्येकाच्याच परिचित होता. ज्ञानेश्वरच्या अकाली निधनाने त्याच्या घरच्यांवर व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वर खेडकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनानंतर चिंतामणी नगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. २६ ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर च्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला होता. आज रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.