January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा शेतकरी

मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊन मधून तुर लंपास

खामगांव: मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊन मधून ४६ क्विंटल तुर लंपास केल्याची घटना २२ तारखेच्या रात्रीच्या सुमारास घडली आहे. दीपिका ज्ञानेश्वर खोडके भांडारपाल महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वरखेड शिवारात आमचे मुख्य कार्यालय आहे. त्याअंतर्गत एमआयडीसी खामगाव येथील सह्योग संकुल जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे गोडाऊन तीन वर्षापासून भाडेतत्त्वावर वखार महामंडळाने ताब्यात घेतले असून तेथे कडधान्य साठवणुकीकरिता वापर करत आहोत.सदर गोडाऊन चे भांडारपाल म्हणुन मी कामकाज पाहत आहे. एप्रिल 2020 पासून नाफेड अंतर्गत प्रत्येकी ५० किलो वजनाचे एकूण १९ हजार ८५० तुरीचे कट्टे सदर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते.काल दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चे दरम्यान ऑपरेटर सुमितसिंह ठाकूर व कर्मचारी मनोज छंगानी यांना गोडाऊनचे लोखंडी शटर एका बाजूनी वाकलेले दिसले तात्काळ त्यांनी याची माहिती भांडारपाल व कर्मचारी दिलीप सुरडकर यांना फोनवरून दिली. माहिती मिळतात सर्वजण मार्केटिंग फेडरेशनचे गोडाऊन वर पोहोचले असता सदर गोडाऊनची पाहणी केली. त्यावेळी गोडाऊनची लोखंडी शटर उजव्या बाजूने लोखंडी पट्टी वाकवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ५० किलो वजनाचे ९२ कट्टा मध्ये असलेली एकूण ४६ क्विंटल दूर किंमत २ लाख ९३ हजार ४८० आत मधे प्रवेश करून चोरून नेली आहे. यावेळी रात्री ड्यूटीवर असलेले वॉचमन प्रदीप कछवे यांनी शटर २२ तारखेला रात्री ८ वाजता चेक केले असता तर व्यवस्थित असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळतात शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भांडारपाल दीपिका खोडके यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४६१,३८० नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय पळसपगार करत आहे.

Related posts

योगदिनी जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेजच्या नवीन सत्रास प्रारंभ

nirbhid swarajya

कोरोना परिस्थितीबाबत आ. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

nirbhid swarajya

जिगाव प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरु; आ. डॉ. संजय कुटे यांचे नेतृत्व..

nirbhid swarajya
error: Content is protected !!