बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खर्डा येथील दिव्यांग महिलेची खुनाची घटना ताजी असतानाच 5 फेब्रुवारी रोजी जामोद येथील लोनखेड शिवारात एका आदिवासी तरुणाचा त्याच्या आई-वडिलांनी खून केल्याची घटना घडली आहे.जळगाव तालुक्यातील जामोद नजीक असलेल्या लोनखेड शिवारात काही आदिवासी कुटुंब राहतात यामध्ये रामभाऊ व त्याचे आई-वडील राहत होते. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान काही शुल्लक कारणावरून रामभाऊ व त्यांचे आई-वडील यांच्यात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. वडील व मुलगा दारूच्या नशेत असल्याने राग अनावर होऊन वडिलांनी रामभाऊ डोक्यात कुदळीने वार केला. आई सुगराबाई ने ठिबकच्या नळीने रामभाऊ ला फाशी देऊन त्यांची जीवनयात्रा संपवली.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईवडिलांना ताब्यात घेतले असून दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.