धानोरा महासिध्द येथील घटना
जळगांव जामोद : तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करून अंत झाल्याची घटना आज दि १८ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या महितीनुसार धानोरा येथे राहणारा सद्या पुणे येथे जॉब करणारा विनायक गाडगे हा लॉकडाऊन मधे आपल्या घरी धानोरा येथे आला होता. काल १७ मे रोजी त्याचे मामा नामदेव वानखडे मलकापुर तालुक्यातील दाताळा येथे असणाऱ्या लग्न समारंभाकरिता घेऊन जाण्यासाठी आपल्या बहिणीला घ्यायला धानोरा येथे आले होते. दुपारी जेवण करुन ३:३० च्या सुमारास मामा नामदेव वानखडे वय ४३, विनायक गाडगे वय २७, तेजस गाडगे वय १८ हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले होते. सध्या कडक उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध शोध सुरू केली. मात्र तिघेही कुठेच दिसून न आल्याने तात्काळ सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांचे शोधकार्य सुरू केलेले असतात धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळून आले. शोध घेईपर्यंत रात्र झाल्यानें अंधारात सदर मृतकांचा शोध लागला नाही. मात्र आज सकाळी गावकरी व पोलिसांनी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसून आले. गावातील काही पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यावर त्यांचा पंचनामा करून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थ क्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे.