खामगांव : उत्तर प्रदेश राज्यात हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरण ताजे असताना तालुक्यातील कदमापुर येथील एका ५ वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षीय नराधम मामाने अत्याचार केल्याची घटना उघड़किस आली आहे.
खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील ५ वर्षीय चिमुरडीवर मामानेच लैगिक अत्याचार केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कदमापूर येथे ५ वर्षाची चिमुरडी ही आपल्या मैत्रिणीसोबत खेळत असताना आरोपी मामा श्रीकृष्ण श्रीराम तायडे वय 55 याने या चिमुरडीला आपल्या राहत्या घरात बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर घडलेला सर्व प्रकार चिमुरडीने सायंकाळी आई-वडील आल्यानंतर त्यांना सर्व घड़लेली हकीकत सांगितली. तर याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 376 (२) (i) भादवि कलम 4,6 बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ए पी आय शेवाळे करीत आहे. पोलिसांना आरोपिचा गावात शोध घेतला परंतु मिळुन आला नाही. तर सदर पीड़ित पाच वर्षीय चिमुरडी ही ग्रामीण पोलिस स्टेशन मधे तक्रार देईल या भीतीपोटी व आपली बदनामी होईल म्हणून त्यानी गावाजवळ असलेल्या एका शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 12 वाजता गावातील एक व्यक्ति शेळ्या चारत असताना त्याला श्रीकृष्ण श्रीराम तायड़े याने गळफास घेतल्याचे दिसले व सदर घटना उघड़किस आली.ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ पी एस आय हरिविजय बोबडे ,एएसआय भगवान राठोड, नापोका संदिप गाडेकर घटनास्थळी दाखल झाले होते.घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनास पाठविण्यात आले होते. अशी माहिती ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार रफीक शेख यांनी दिली आहे. या प्रकरणी उशीर पर्यंत मृत्यु ची नोंद करण्यात आली नाही.
previous post