November 20, 2025
महाराष्ट्र

माफी मागा,अन्यथा कारवाई करणार ; संभाजी राजेंचा निलेश साबळेंना इशारा

सोशल मीडिया अपडेट : “लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो,” अशी टीका छत्रपती संभाजी राजे यांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमवर केली आहे व निलेश साबळे आणि संबंधित वाहिनीनं गैरकृत्याची जबाबदारी स्वीकारून माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.
“लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे, अशा शब्दात छत्रपती संभाजी राजे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
“आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही ते म्हणाले.
“निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी.अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे व  त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related posts

अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला

nirbhid swarajya

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत संगणक परीचलकांच्या मानधन होणार वाढ – राज्याध्यक्ष सुनीताताई आमटे

nirbhid swarajya

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी खामगांवात…

nirbhid swarajya
error: Content is protected !!