November 20, 2025
अकोला अमरावती आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शेगांव सामाजिक

मानाच्या नऊ पालख्यांना पायदळ वरीला परवानगी द्यावी

इतरही पालखी सोहळ्याला किमान दहा वारकऱ्यांना वाहनाने परवानगी द्यावी

शेगांव: पंढरपूर आषाढी पायदळ वारी हे वारकऱ्यांचा प्राण आहे आणि गेल्या वर्षापासून कोरोना संकटामुळे पंढरपूर वारी ,यात्रा बंद आहेत. मागील वर्षी वारकर्‍यांनी सरकारला सहकार्य केलं व सरकारच्या आणि प्रशासनाच्या मर्जीप्रमाणे शेकडो वर्षांची परंपरा असणारा पायदळ वारी सोहळा खंडित करून प्रातिनिधिक स्वरूपात ९ मानाच्या पालख्या बसने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या, पण आता यावर्षीची परिस्थिती फार वेगळी आहे. आज मानाच्या पालखी सोहळ्याच्या काही महाराज मंडळींची आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली असता वारकऱ्यांनी पाचशे वारकऱ्यांच्या उपस्थित सोहळा करण्याची परवानगी मागितली आहे, आणि ते अगदी योग्य मागणी आहे. पण उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वारकऱ्यांचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून निर्णय घेण्याचे कळवलेले आहे. आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना नम्र विनंती केली की या पालखी सोहळ्यात किमान पाचशे वारकऱ्यांची मागणी नियम व अटी लावून आपण पूर्ण करावी. पण महाराष्ट्रातून विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतातील किमान ४०० पालख्या पायदल पंढरपुरला येत असतात. इतर पालखी सोहळ्याला पायदळ वारी करिता कोरोना संकटाचा विचार करून आम्ही सरकारला आग्रह करणार नाही.

पण त्या पालखी सोहळ्याची वारी खंडित होऊ नये याकरिता आपल्या हद्दीतील तहसील कार्यालया मधून प्रत्येक पालखी सोहळा सोबत कमीत कमी दहा वारकऱ्यांना शासनाचे सर्व नियम व अटी लागू करून वाहनाने पंढरपूर करिता जाण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून शेकडो वर्षाची परंपरा खंडित होणार नाही. सरकारने कोरोना काळात पंढरपूर येथे स्वर्गीय भालके नाना यांच्या जागेवर पोट निवडणूक घेतली आणि या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या मीटिंग,हजारो जन समुदायांमध्ये मेळावे घेण्यात आले.

आता लोक डाऊन लागण्याच्या आधी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले पूर्ण महाराष्ट्र मध्ये लोक डाऊन लागेल पण पंढरपूर येथे मतदान झाल्यानंतर लोक डाऊन लागेल कारण की पंढरपूरची निवडणूक ही अतिशय महत्त्वाचे आहे आम्ही सरकारला सांगितले तो ज्याप्रमाणे आपल्या करिता राजकीय दृष्ट्या निवडणूक अतिशय महत्त्वाचे आहे त्याप्रमाणे वारकऱ्यांना सुद्धा आषाढीची वारी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती व ज्याप्रमाणे मानाच्या पालखी सोहळाच्या संत मंडळींचे अडचणी जाणून घेण्याकरिता पुणे येथे प्रशासकीय मीटिंग घेण्यात येते त्याप्रमाणे इतरही प्रांतातून जाणाऱ्या पालखी सोहळ्यात करिता प्रशासकीय मीटिंग घेऊन वारकर्‍यांना पंढरपूर येथे जात असताना कोणत्या समस्या येतात ह्या जाणून घ्या ही विनंती करण्यात आली आहे. आपण वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व वारकरी सेना तर्फे देण्यात आला आहे.

Related posts

खामगावातील खाजगी रुग्णालये अधिग्रहित

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ०८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

पाणी टंचाई निवारणार्थ ३० विंधन विहीरी मंजूर

nirbhid swarajya
error: Content is protected !!