सुंदरता’, ‘नृत्य’ आणि ‘अभिनय’ यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षितने फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर काहीच वर्षांत आपले बस्तान बसवत ‘हम आपके है कौन’, तेजाब, परिंदा, राम-लखन, किशन कन्हैया, जीवन एक संघर्ष, जमाई राजा, हे हिट सिनेमे केले.मात्र आता हिच माधुरी रुपेरी पडद्यापासून दूर जाणार आहे. रिअॅलिटी शो, चित्रपट तसेच अनेक जबाबदारीच्या भूमिकेत दिसलेली माधूर आता नव्या विश्वात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.ही नवी दुनिया चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिसच्या पलीकडली आहे. कारण, धक धक गर्लने ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे. ती लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. येथील प्रेक्षकवर्ग तिच्यासाठी नवा असणार आहे.या वेब सीरिजची निर्मिती बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर करणार असल्याचे म्हटले जाते. ही वेब सीरिज एक फॅमिली ड्रामा असून सस्पेन्स थ्रिलर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. माधुरीच्या या वेब सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. माधुरीसोबत कोण झळकणार हे देखील गुलदसत्यामध्ये ठेवण्यात आले आहे.