खामगांव:सेवा पंधरवाडा निमित्ताने आज अजून एका मोठ्या अश्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या नवीन राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आ अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आला श्री संत गजानन महाराज प्रतिमेचे पूजन केल्यानंतर या अभियानांतर्गत आजपासून गरोदर माता यांच्या विशेष तपासणी कक्षाचेच उदघाटन आमदार अँड फुंडकर यांचे शुभहस्ते बाह्यरुग्ण विभाग परिसरात करण्यात आले. तसेच त्यांनी गरोदर माता संदर्भात पोषक आहार व या संदर्भातील इतर जनजागृती व्हावी यासाठी रुग्णालयात केलेल्या प्रदर्शनिला भेट देऊन पाहणी केली. या विशेष अभियानाचा अधिकाधिक गरोदर मातांनी लाभ घेऊन आपले व येणाऱ्या बाळाचे आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन याप्रसंगी आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी केले.