January 4, 2025
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा लोणार

” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या कामाच्या ऑनलाईन सर्वेक्षण नोंदीवर संगणक परिचालकांचा बहिष्कार

लोणार : राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना ”माझे कुटुंब, माझी जबाबदारी “ही योजना आरोग्य विभागामार्फत राबवत असून लोणार तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये घरोघरी जाऊन सर्वे झाला आहे. त्या सर्वेच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना पत्र काढून ऑनलाइन नोंदणी करण्याचे सांगितले.परंतु सदरचे काम हे संगणक परिचालकांचे नाही व संदर्भीय शासन निर्णय हा आरोग्य विभागाचा असून त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या संगणक परिचालकांचे कोणत्याही प्रकारची जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही.त्याचबरोबर गेले तीन महिने संगणक परिचालक यांना हक्काचे मानधन मिळाले नाही.ZERO AMMOUNT CALCULATED चा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही ,तर मग हे काम संगणक परिचालक यांनी का आणि कोणत्या अधिकार करावे.

आणि हे काम केले तर त्याचा मोबदला किती मिळेल ? व तो मोबदला कोण देणार ? याबाबत आपण लेखी मार्गदर्शन करावे, तोपर्यंत सदरचे काम तालुक्यातील कोणताही संगणक परिचालक करणार नाही व काही संगणक परिचालक यांना पंधरा दिवसासाठी सस्पेंड केले आहे त्यांना त्वरित रुजू करावे व काही संगणक परिचालक यांना सन 2016, 2017, 2018 ,2019 मधील काही महिन्यांचे मानधन बाकी आहे ते सुद्धा लवकर मिळावे. या कारणामुळे लोणार तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष श्री रामकिसन दराडे व सचिव उद्धव नागरे यांनी आज गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार तालुका व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्र लोणार यांना निवेदन देऊन माझे “कुटुंब कुटुंब माझी जबाबदारी “या कामाच्या ऑनलाईन सर्वेक्षण नोंदी करण्याच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. यावेळी ज्ञानेश्वर नागरे,भूषण शेट्टे व इतर संगणक परिचालक उपस्थित होते .

Related posts

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेकरिता विधी पहुरकरची निवड

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 68 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 03 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

खामगाव मध्ये घरासमोर नवीन कपडे आणि पैसे टाकून जात असल्याचा प्रकार

nirbhid swarajya
error: Content is protected !!