January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

माजी सरपंच विरिद्ध संतोष येवले विरुद्ध गुन्हा दाखल…

खामगाव- पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केले मात्र दुसऱ्या पत्नीस घरी येवू न देता तिचा छळ केल्याप्रकरणी शेलोडी येथील माजी सरपंच संतोष येवले विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे . याबाबत कविता संतोष येवले ( ३५ ) यांनी ग्रामीण पोस्टेला दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की संतोष येवले सोबत त्यांचे जुने प्रेम संबंध होते . मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध . होता . त्यामुळे त्यांनी आपल्या जातीच्या व्यक्तीसोबत लग्न केले होते . मात्र कविता यांच्या पतीचे अपघातात निधन झाले . त्यानंतर संतोष येवले याने ‘ मी तुझा सांभाळ करेल ‘ असे म्हणून कवितासोबत लग्न केले . मात्र घरी न नेता साईनगर वाडी येथे भाडयाची खोली करुन ठेवले . संतोष येवले पासून कविता यांना एक मुलगा झाला आहे . या मुलाचा जन्म झाल्यापासून संतोष हा कविताशी भांडत आहे . दरम्यान कविताने ‘ मला शेलोडी येथे घरी घेवून जा ‘ असे म्हटले असता संतोषने नकार देत कविता यांचा शारिरीक व मानसिक छळ केला . तसेच ‘ तू शेलोडी येथे घरी आली तर तुझे हातपाय तोडून टाकीन ‘ अशी धमकी दिली . या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी संतोष येवले विरुध्द कलम ४ ९ ८ , ४ ९ ८ ( अ ) , ३२३ , ५०४ , ५०६ भादंवी तसेच सहकलम ३ ( आय ) ( आय ) ( ड ) , ३ ( २ ) ( व्हीक्यू ) अनुसूचीत जाती जमाती अपराध प्रतिबंधीत अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे .

Related posts

जिल्ह्यातील पुणे येथे अडकलेल्या विद्यार्थी व नागरिकांची घरवापसी

nirbhid swarajya

सावित्री जिजाऊ जन्मोत्सव निमित्त समता परिषदेच्या वतीने डिजिटल व्याख्यानमालेचे आयोजन

nirbhid swarajya

चाँद दिसला; ‘रमजान’चे उपवास सुरू

nirbhid swarajya
error: Content is protected !!