माजी आ.स्व.गोविंददासजी भाटिया यांची राजकीय कारकीर्द सुरुवात आणि प्रवास….त्यांच्या लोकसेवेचा मार्ग बहुशाखीय आणि बहुउद्देशीय असाच होता, त्यांच्या राजकारणाचा हाच धागा पक्का होता. आज वडिलांच्या कारकीर्दीवर हक्क सांगून राजकीय पक्षात स्थान मिळवण्यासाठी ची प्रथा वाढू लागली आहे. तरुणांना संधी द्या म्हणजे आमच्या वडिलांच स्थान आम्हाला द्या असा सरळ मार्ग अवलंबिला जात आहे. स्वर्गीय भाटिया यांचे पूर्वज कधीही राजकारणात नव्हते. गोविंददासजींनी स्वतः आपल्याला धैर्याने समाजकार्यात वाहून घेतल. राजकीय प्रवासाला सुरुवात झाली तेव्हा त्यांची सहकार्य करण्याची जिद्द संघटन आणि सामाजिक कार्याची बांधिलकी हात पक्का पाया तयार झाला. लोकसंख्येचे वाढवणे ही एक प्रक्रिया राजकारणात महत्त्वाची असते.
स्व.भाटिया यांनी नागरिकांना वस्तू माफक दरात मिळावे म्हणून खामगाव तालुक्यात काही सोसायट्या निर्माण केल्या आहे. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावर अनेक संस्था उभ्या केल्या, वाढवल्या संस्थेबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण केला, राजसत्तेत इतरांना सहभागी करुन घेतले. परिणामी राजकीय नेतृत्व करणारी पिढी त्यांची सहकारी बनली. काही गेले काही राहिले याबद्दल त्यांची उदारता त्यांचे यशाची पायरी बनली. सर्व समाजात ते समरस झाले. बुलढाणा जिल्हात आडव्यातिडव्या पसरलेल्या अनेक जाती पंथ त्यांच्या जीवन प्रणालीला जोपासत सर्वांना जवळ करीत असत आजच्या नव्या नेतृत्वाला बिजांकुर वाढीस लागावी अशी घाई होते वाट बघण्याची त्यांना फुरसत नसते. शून्यातून आपले विश्व निर्माण करताना कधीच चुकीचा आणि घाईचा निर्णय घेतला नाही.
जुन्या मार्गाने प्रश्न सुटत नाहीत आणि नवीन मार्ग त्याकाळी सिद्ध झाले नव्हते. अशी कठीण परिस्थितीत मनाचा निर्धार कायम ठेवून बुलढाणा जिल्हा आणि खामगाव च्या विकासासाठी जुन्या नव्या विचारांची अभ्यास करून रचना केली सर्व योग्य योजना तयार करणे प्रस्ताव आणि मजुरी या मंजुरी या बाबत तर स्व. गोविंददासजी राजकीय चरित्र वाचन फार मोलाचे ठरते. तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री आणि भाटीयाजी यांच्या प्रस्तावाला कायम मान देऊन मंजूर केले. भाटिया यांनी तत्परतेने, अंमलबजावणी देखील केली. सर्वसामान्य व्यक्ती देखील मार्गदर्शन करू शकतात हे त्यांनी आधी काढून घेतले होते. ही महत्त्वाची बाब त्यांच्याकडून आवर्जून शिकण्यासारखी होती. स्वातंत्र्य सैनिकां बद्दल त्यांना नितांत आदर होता. खेड्यापाड्यातून पसरलेल्या दीन-दरिद्री दुबळा यांच्या उद्धाराची काम हाती घेतले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि त्यांना नवजीवन देण्याचे कायम प्रयत्न केले.