खामगाव : काल दिनांक ७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार ओबीसी आरक्षण बचाव महाअधिवेशनासाठी खामगाव येथे आले असता त्यांनी येथील काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी भेट दिली.यावेळी सानंदा परिवाराच्या वतीने ना.विजय वडेट्टीवार यांचा शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची चांदीची मुर्ती देऊन पारिवारीक सत्कार करण्यात आला. यावेळी सानंदा यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी त्यांना विचारले की आपण पुनर्वसन मंत्री आहात तर सानंदाजींचे पुनर्वसन पक्षाकडून होईल का ? तेव्हा या प्रश्नाला उत्तर देत ना.वडेट्टीवार यांनी सांगितले की, सानंदा हे विदर्भातील काँग्रेसचे एक नामवंत व मोठे नेते आहेत.
राजकारणामध्ये सामाजिक भावना जोपासणारे म्हणून त्यांची सामान्य माणसांमध्ये ओळख आहे,खास करुन विदर्भात त्यांची ओळख आहे.एक ताकदवर व दबंग नेता म्हणून ते काम करतात. सामान्य माणसाचे काम आले की ते लगेच सोडवायचे ही त्यांची वृत्ती आहे. माझी व त्यांची २० वर्षापासून ओळख आहे. मंत्रालयात सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांचे दार ठोठावणारे नेता म्हणून सानंदा यांची ओळख आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसला अच्छे दिन आलेत की दिलीपकुमार सानंदा जी यांना सुद्धा अच्छे दिन येतील व पक्षाकडून त्यांना लवकरच मोठी जबाबदारी सुद्धा देण्यात येईल असे आमदार वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ना.विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे खामगाव विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.