२१ गाव पाणी पुरवठा योजना सुरू
खामगाव:लाखनवाडा परिसराची जिवनदायनी असलेली लाखनवाडा २१ गाव पाणी पुरवठा योजना विज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठवड्यापासून २१ गाव पाणी पुरवठा बंद होता. त्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई भासत होती अखेर खामगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चैतन्य पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकृष्ण धोटे व लाखनवाडा बु चे सरपंच शेख अफरोज शेख युसुफ यांनी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची भेट घेऊन २१ गाव पाणी पुरवठा योजना पुर्ववत सुरू करण्याकरिता विनंती केली असता माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन २१ गाव पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले असता विज वितरण कंपनीने काही रक्कम भरण्याच्या अटीवर विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व ग्रामपंचायत सरपंचांनी एक महिन्याच्या आत बिल भरण्याचे लेखी पत्राद्वारे दिल्यामुळे विज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला. गेल्या एक आठवड्यापासून २१ गाव पाणी पुरवठा योजनेचे लाभार्थी पिण्याच्या पाण्यापासून त्रस्त झाले होते,सदर बाब माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या निदर्शनास आनुन दिल्यानंतर तात्काळ कारवाई होऊन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला त्या बद्दल नागरिक आभार व्यक्त करीत आहेत
एकाच दिवसात पाणी पुरवठा सुरू
गेल्या आठवड्यापासून २१ गाव पाणी पुरवठा योजना बंद असल्याने जनतेचे हाल होत होते त्या बाबत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची भेट घेतली व २१ गाव पाणी पुरवठा चालू करणे बाबत विनंती केली तेव्हा सानंदा साहेबांनी याची दखल घेऊन एकाच दिवसात पाणी पुरवठा सुरू केला.