खामगाव : ओळखीचा गैरफायदा घेवून महिलेवर एका युवकाने अत्याचार केला. तसेच अश्लिल व्हीडीओ तयार करून त्याव्दारे ब्लॅकमेल करून वारवार पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव मधे उघडकीस आला आहे. याबाबत अत्याचार झालेल्या पीडित महिलेने शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी सदर युवकाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४२ वर्षीय पीडितेने पोस्टेला दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, फ्रिज फायनान्स घेण्यावरून अशोक शेषराव इंगळे (३०) रा. जुनाफैल याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेवून अशोकने सदर महिलेला शेगाव येथे लॉजवर नेले व चाकूचा धाक दाखवून बळजबरीने अत्याचार केला. तसेच कन्या शाळेच्या ग्राऊंडवर नेवूनही अनेक वेळा अत्याचार केला. या प्रकाराचा त्याने चोरून व्हीडीओ काढला व त्याव्दारे तो सदर महिलेला वारंवार पैशांची मागणी करीत होता.पीडित महिलेने आतापर्यंत अशोक इंगळेला १ लाख रूपये दिले असून अशोक इंगळे हा अधिक पैशाची मागणी करून हा व्हीडीओ व्हायरल करण्याची तसेच पतीला दाखविण्याची धमकी देत आहे. अशा आशायच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अशोक शेषरावब झंगाळे याच्या विरूद्ध ३७६(३), ३७६(२)(एन) ५०६ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.