November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी बातम्या

महिलेने केला महिलेचा विनयभंग

खामगाव : येथून जवळच असलेल्या सुटाळा बु.येथे काल सकाळच्या सुमारास एका ५५ वर्षीय महिलेने एका २२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली.असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खामगांव येथून जवळ असलेल्या सुटाळा बु.येथे काल सकाळच्या सुमारास २२ वर्षीय महिला व ५५ वर्षीय महिला यांच्यात रस्त्यावर वाद झाला होता.यावेळी ५५ वर्षीय महिलेने फिर्यादी महिलेस ‘तू सावत्र मुलांना जेवायला देत नाही व चांगले वागवत नाही’ असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली व फिर्यादी महिलेचे केस ओढले. यावेळी फिर्यादी महिला केस सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असताना झटापटीत ५५ वर्षीय महिलेने फिर्यादीचे कपडे फाडून विनयभंग केला याप्रकरणी फिर्यादीने काल रात्री उशिरा शिवाजी नगर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त ५५ वर्षीय महिला आरोपी विरूध्द भादंवि कलम ३५४, २९४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका मोहन करूटले करीत आहेत.

Related posts

बुलढाणा जिल्हयात मध्यम पावसाची शक्यता

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्ह्यात शहरातून परतले ३८७७९ नागरिक

nirbhid swarajya

खामगावात जनता कर्फ्यू १०० % यशस्वी.. आ.आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद

nirbhid swarajya
error: Content is protected !!