April 16, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास

खामगाव : जलालपुरा येथील वसतकार यांच्या दूध डेरी समोर अज्ञात चोरट्यांनी 45 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल 3 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी पोत लंपास करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोपाळ नगर येथील रहिवासी निर्मला अंबादास किरकाळे वय 45 हे जलालपुरा येथे फुटण्याचा हातगाडीवर व्यवसाय करतात तर व्यवसाय आटपून काल 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास त्यांच्या पतीसह हात गाडी घेऊन घरी जात असताना कोणीतरी 20 ते 22 वर्षाच्या अज्ञात चोरट्याने महिलेच्या मागून येऊन गळ्यातील अंदाजे 10 ग्रॅम 30 हजार रुपये किमतीची पोत हिसकावून पोबारा केला तर याप्रकरणी निर्मला अंबादास किरकाडे यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय ठाकूर हे करीत आहेत.

Related posts

अवैध उत्खन्न प्रकरणी जांदू कंस्ट्रक्शनला ७ कोटीचा दंड

nirbhid swarajya

आपल्या खामगावच्या विद्यार्थ्यांचा शितल अकॅडमीच्या माध्यमातून राज्यस्तरावर यश…

nirbhid swarajya

इलेक्ट्रिशन प्लंबर असोसिएशन खामगांव तर्फे वृक्षारोपण

nirbhid swarajya
error: Content is protected !!