खामगाव:शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभाग अंतर्गत सिविल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन CESA या विद्यार्थ्यांच्या संघटनेने जागतिक महिला दिनानिमित्त वुमन एम्पॉवरमेंट अँड जेंडर जस्टीस या विषयावर तज्ञ व्याख्यान आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय ज्योती धंदर पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या पत्नी ज्योती अमोल कोळी सामाजिक कार्यकर्ता यांना आमंत्रित करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर एस एस प्रभुणे, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. व्ही. टी. आटोळे तसेच अधिव्याख्याता श्री एम डी घोडले, श्री एस आर सोनी, श्री पी व्हि बाहेकर, प्रा. एस एम इंगळे, प्रा.पी ए यादगिरी,आणि विभागातील प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थिनी उपस्थित होते उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये अतिथींनी मुलींच्या किशोरवयीन दरम्यान येणारे विविध समस्या आणि प्रश्न याबाबत सविस्तर कायदेशीर आणि सामाजिक मार्गदर्शन केले त्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करून सर्व विद्यार्थीनीसोबत संवाद साधला.असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.