बुलडाणा -महिलावरील अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस जिल्हा बुलडाणा तर्फे ‘अवंति’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.बुलडाणा येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात या हेल्पलाईनचे उद्घाटन करण्यात आले.जिल्ह्यातील सर्व मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या सूचनेनुसार, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि जिल्हा अध्यक्ष नाझेर काझी यांच्या नेतृत्वाखाली,
युवती प्रदेश अध्यक्षा सक्षना ताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस जिल्हा बुलढाणा कडून ही” अवंति हेल्पलाइन ” सुरू करण्यात आली आहे.
या हेल्प लाईन अंतर्गत हेल्प लाईन नंबर प्रसारीत केला जात आहे.
घरात, कामाच्या ठिकाणी, शाळा कॉलेजात तसेच बाहेर कुठेही कुठल्याही महिलेवर अन्याय अत्याचार होत असल्यास या हेल्पलाइन नंबर वर कॉल केल्यास त्वरित मदत केली जाईल. आणि त्याकरिता प्रत्येक तालुक्यात या हेल्पलाइन अंतर्गत प्रतिनिधी नेमले जातील. इतकेच नव्हे तर प्रत्येक तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात महिलांच्या कार्यशाळा घेऊन कायदेविषयक, आरोग्य विषयक, व्यावसायिक तसेच आर्थिक व्यवहारा विषयी मार्गदर्शन केले जाईल ,अशी माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अँड मीरा बावस्कर(माहुलीकर यांनी दिली आहे. कार्यक्रमास यावेळी जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी ,जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तुकाराम अंभोरे,नरेश शेळके,संजय गाडेकर,संतोष रायपुरे,अनिल बावस्कर,जिल्हा परिषदेच्या सभापती पूनमताई राठोड,महीला जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे,राहुलभाऊ देशमुख,पराग अवतार, मनिष बोरकर,भूषण दाभाडे,शंतनू बोंन्द्रे , अंबादास पाटील,देवेंद्र देशमुख,सुमीत सरदार,रविंद्र तोडकर,सुभाषजी देव्हडे,अतुलभाऊ लोखंडे,दिलीप घनोकार,रविकांत माहुलीकर व जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी उपस्थित होते.