खामगांव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट तथा बहुजन टायगर सामाजिक संघटनेच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पूर्ववत करण्यात यावे , महावितरण चे धोरण शेतकरी बांधवांचा त्रासदायक असून रात्रीच्या वीजपुरवठा ऐवजी वीजपुरवठा दिवसा देण्यात यावा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एक्ट्रासिटी कमकुवत करणारे पत्रक पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांच्यामार्फत तपासणीचे अधिकार पूर्ववत करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पिक विमा देणार या कंपनीचा करार रद्द करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून सदरचे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी कैलास शिरसाट यांनी सांगितले. सरकारने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास यावरूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.