November 20, 2025
अकोला अमरावती आरोग्य क्रीडा खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा ब्लॉग मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा राजकीय लोणार विदर्भ व्यापारी शिक्षण शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा सोलापुर

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई:राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल,अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:
सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित
आदिवासी विकास
गिरीष महाजन
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे
बंदरे व खनिकर्म
संजय राठोड
अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे
कामगार
संदीपान भुमरे
रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत
उद्योग
प्रा.तानाजी सावंत
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार
कृषी
दीपक केसरकर
शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई
राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा-
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Related posts

आम्ही रुग्णसेवक ग्रुप व पळशी बू गावकरी मंडळी महात्मा फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे

nirbhid swarajya

Tex Perkins On How To Get Into Live Music & More

admin

माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या प्रयत्नांना यश

nirbhid swarajya
error: Content is protected !!