खामगांव : महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती खामगांव तालुका यांच्या वतीने येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनातनमूद आहे मुख्यमंत्री यांचे आदेशाने, कोविड-१९ च्या माहामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. त्यामुळे बऱ्याचपैकी रोजगारांवर आर्थिक परिणाम झालेला आहे. बरेच उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. पण नोकरदार व उद्योगपती त्यांच्या जमापुंजीच्या भरवशावर सदर परिस्थितीचा सामना करीत आहेत, परंतु कलावंतांचे संपुर्ण कार्यक्रम बंद पडल्यामुळे त्यांच्या कडील जमापुंजी संपलेली आहे. पुढल दिवस कसे जातील याची प्रत्येक कलावंताना व त्यांच्या कुटुंबियांना काळजी लागलेली आहे. कोविड – १९ या जागतीक महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमावर सुध्दा बंदी आलेली आहे. या नियमांचे पालन आम्ही सर्व करीत आहोत. त्यातच आम्ही सर्व लोककलावंत तसेच वाद्यवृंद व गायक कलावंतांचे संपूर्ण कार्यक्रम बंद असल्यामुळे आमचे हाल-बेहाल होवून आमच्या सर्वाच्या कुटंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांना निवदनाव्दारे सर्व कलावंताची यादी देऊन थोडे फार मानधन देण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली आहे.तरी मुख्यमंत्री साहेबांनी सर्व कलावंताकडे लक्ष देवून प्रत्येकि ५०,००० रु आर्थिक मदत जाहीर करुन द्यावी अशी मागणी कालावंतानी केली आहे.