April 4, 2025
बातम्या

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने किशोर खडे व श्रीधर ढगे यांना तानुबाई बिर्जे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर यांनी केले पत्रकारांना मार्गदर्शन

संग्रामपूर:-महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिनाचा सोहळा ७ जानेवारी रोजी वरवट बकाल येथे पार पडला. यावेळी दैनिक देशोन्नतीचे संग्रामपूर विशेष प्रतिनिधी किशोर खडे त्यांना जळगाव जामोद मतदारसंघांमधून व न्यूज लाईन मीडियाचे विदर्भ ब्युरो चीफ श्रीधर ढगे पाटील यांना खामगाव मतदार संघा मधून तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

प्रास्तविक हमीद पाशा यांनी केले. यावेळी मॅक्स महाराष्ट्र मुंबईचे वरीष्ठ संपादक राहुल पहूरकर,खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोरआपा भोसले, जानराव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, लोकेश राठी तालुका अध्यक्ष भाजपा, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, डॉ गणेश दातीर हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दैनिक देशोन्नती चे विशेष प्रतिनिधी किशोर खडे व न्यूज लाईन मिडीयाचे विदर्भ ब्युरो चीफ श्रीधर धगे पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच राष्ट्रीय चर्मकार संघाच्या प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती, विदर्भ प्रसिद्धीप्रमुख, प्रदेश सदस्य निवड झाल्याबद्दल विठ्ठल निंबोळकर यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मॅक्स महाराष्ट्र चे संपादक राहूल पहुरकर यांनी पत्रकारिता आज काल आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले ग्रामीण पत्रकारिता हि समृद्ध आणि खडतर आहे. सामान्यांचे प्रश्न मांडायचे असेल तर ग्रामीण पत्रकारांनी आता पुढे यायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रल्हाद दातीर तर आभार प्रदर्शन विठ्ठल निंबोळकर यांनी केले कार्यक्रमाचेसाठी अमोल ठाकरे ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद दातार प्रमुख उपस्थिती ,जानरावजी देशमुख जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, लोकेश राठी तालुका अध्यक्ष भाजपा, डॉ, गणेश दातीर जिल्हा सदस्य भाजपा तथा माजी तालुकाध्यक्ष भाजपा , किशोर खडे देशोन्नती विशेष प्रतिनिधी, अझर अली लोकमत तालुका प्रतिनिधी, विठ्ठल निंबोळकर अजिंक्य भारत तालुका प्रतिनिधी, सुनील ढगे देशोन्नती , सचिन पाटील, सुचित धनभर, अमोल ठाकरे नवभारत नवराष्ट्र संग्रामपुर तालुका प्रतिनिधी, नंदू खांनझोड , राजू लोणकर, दयलसिंग चव्हाण तरुण भारत तालुका प्रतिनिधी, उदयभान दांडगे, अनिल सिंग चव्हाण, निलेश चिपडे, सचिन पाटील, हमीद पाशा, गोपाल इंगळे, रफिक मातृभूमी तालुका प्रतिनिधी, अब्दुल भाई या संग्रामपूर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते

Related posts

केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल; आता ‘या’ वेळातही तिरंगा फडकवता येणार

nirbhid swarajya

नसबंदी बाबत अजूनही पुरुषी अहंकार कायम…वर्षभरात जिल्ह्यात केवळ ३१ पुरुषांच्या शस्त्रक्रिया…

nirbhid swarajya

आजची स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर – ऍड. जयश्रीताई शेळके

nirbhid swarajya
error: Content is protected !!