April 17, 2025
जिल्हा बुलडाणा

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज १ मे रोजी पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिलहा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील – भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी आदींची उपस्थिती होती. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आले आहे. यावर्षीचा महाराष्ट्र दिन कार्यक्रमही अत्यंत साधेपणाने जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण करण्याबाबत सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला.

सौजन्य – जिमाका

Related posts

अवैधरित्या साठवलेला तांदूळ व गुटखा जप्त

nirbhid swarajya

अन् ओसाड भिंती झाल्या बोलक्या….!

nirbhid swarajya

दोन ऑटो चालकांमधे शुल्लक कारणावरून वाद ; एकाचा खून

nirbhid swarajya
error: Content is protected !!