खामगांव : Covid-19 या अदृष्य विषाणु विरूद्ध लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र लढणा-या कोरोना योद्ध्यांना महाराष्ट्र एसटी कामगार सेना खामगाव आगारातर्फे राज्य चिटणीस गजानन माने, विभागीय सचिव विजय पवार, विभागीय अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय सहसचिव श्री संदिप पाचपोर यांच्या नेतृत्वाखाली पुष्पवृटी करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र एसटी कामगार सेना खामगाव आगार आगार युनिट तर्फे सामान्य रुग्णालयातील डाॅक्टर्स, नर्स, वार्डबाॅय व पोलिस दलातील सर्व कर्मचारी यांचा उत्साह वृद्धींगत करण्यासाठी सामाजिक दायित्वातून स्थानिक प्रशासनाची परवानगीने सोशल डिस्टन्सिंगची योग्य ती खबरदारी घेत प्रथम सामान्य रुग्णालयातील डाॅक्टर्स, नर्स व वार्डबाॅय यांची आरती करुन कोरोना योद्ध्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शहराच्या प्रत्येक चौकात ज्याठीकाणी पोलिस दल बंदोबस्तासाठी तैनात आहे याठीकाणी व पोलिस स्टेशन मध्ये जावुन पोलिस दलातील सर्व जवानांवर पुष्पवृष्टी करुन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी आगार प्रमुख संदिप पवार, स्थानक प्रमुख रामकृष्णा पवार, वाहतूक निरीक्षक स्वाती तांबटकर, हजर होते, संजय धनोकार (वाहतुक नियंत्रक) आगार अध्यक्ष इकबाल खान आगार सचिव गोपाल तायडे, कार्याध्यक्ष डी. झे.तायडे, राजेश महाडिक, संजय दिपके, राजेश कळमकर, संदिप बगाडे, विष्णुदास गाढवे, जयदीप वहिले हे महाराष्ट्र एसटी कामगार सेना खामगाव आगाराचे पदाधिकारी उपस्थित होते.