November 20, 2025
आरोग्य महाराष्ट्र

महाराष्ट्रात ही चीन प्रमाणे युद्धपातळीवर उभारणार कोविड – १९ हॉस्पिटल

मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी चीन ने ज्या प्रकारे वुहान शहारात १००० खाटांचे कोविड १९ हॉस्पिटल युद्धपातळीवर उभारले तसेच भारतातही महाराष्ट्र सरकार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात १००० खाटांचे कोविड १९ हॉस्पिटल उभारत आहे. हे  हॉस्पिटल ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. पुढील १५ दिवसांत हे हॉस्पिटल युद्धपातळीवर उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नगरविकस मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष टिम तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरवातही केलीय. याच युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची पहाणी करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
ठाणे येथील ज्यूपीटर  हॉस्पिटल च्या मार्गदर्शनाखाली आणि एमएमआरडीए संयुक्तपणे या १०० खाटांच्या हाँस्पिटलची निर्मीती करत आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील भूखंडावर उभारल्या जात असलेल्या कोविड-१९ हॉस्पिटल च्या सुरू असलेल्या कामाची पाहाणी केली.

MMRDA ज्युपिटर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली हे १००० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे करीत आहे. अंदाजे १५ दिवसांत हे रुग्णालय उभे राहणार आहे, त्यापैकी काही भाग हा येत्या ८ दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.


Related posts

वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर २७ जुलै रोजी खामगावात

nirbhid swarajya

१५ डिसेंबर ला हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभावर पोलिस पाटलांचा महामोर्चा धडकणार …

nirbhid swarajya

कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आव्हान

nirbhid swarajya
error: Content is protected !!