मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाले आहे. यामध्येच महाराष्ट्रातील ९५ वारकरी मथुरा वृंदावन, उत्तरप्रदेश येथे अडकलेले होते.कोरोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण भारतात लॉकडाऊन चा आदेश लागू केलेला असून या काळात सर्व वाहतुकीचे साधने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील हे ९५ वारकरी मथुरा येथे अडकलेले होते.या वारकरी बांधवांशी दररोज एकनाथ शिंदे दूरध्वनीवरून संपर्क साधून आधार देत होते.
गेली 3 दिवसांपासून शिंदे यांचे सर्व वारकऱ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून मथुरा येथे सर्व वारकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करून उत्तरप्रदेश सरकारने या सर्व वारकरी बांधवांना परतीच्या प्रवासास मान्यता दिली आहे.
आज मथुरा, उत्तरप्रदेश येथून 2 ट्रॅव्हल्सची व्यवस्था करून हे सर्व वारकरी महाराष्ट्रात आले आहेत. सर्व वारकरी बांधवानी त्यांच्या राहण्याची, जेवणाची तसेच महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.