खामगांव : वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप, आमचे प्रेरणास्थान व आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच आज हिंदुस्थानात हिंदू जीवंत आहेत. महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा होणारच आहे. पुतळ्याला कोणी विरोध केला तर विहिप बजरंग दल रस्त्यावर उतरेल असा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे निवेदनातुन देण्यात आला आहे. महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याऐवजी सैनिकी शाळा सुरू करा अशी भुमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मांडल्याने त्यांच्या विरोधात सर्व हिंदू समुदायाचा भावना दुखावल्या असल्याने सर्व समाजातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणार इम्तियाज जलिल कोण ? संभाजीनगर महापालिकेने ८७ लाखाचे बजेट तयार करून पुतळा उभारणीसाठी मान्यता घेतली आहे. नियमानुसार तिथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा बसवला जाणार आहे. आता केवळ निविदा काढणे बाकी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुतळा होणारच आहे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत आमचे प्रेरणास्थान आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमच्या धर्मावर आकस ठेवून बोलण्याचे काम खासदार करत आहेत सोबतच रण खराब करण्याचे ते काम करतात. एमआयएम खासदारांचे राजकारण आता लोकांच्या ध्यानात आले आहे. महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा होणारच. विरोध करताना आपण कोणाला विरोध करतोय हे आधी खासदारांनी समजून घ्यावे त्यांनी इतिहास वाचावा .आशा समाजविघातक प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून आशा लोकप्रतिनिधिना कठोर शासन करावे अन्यथा विहिंप बजरंग दल मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारेल असा इशारा त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
next post