मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून आ. लंके यांचे कौतुक
शेगांव : भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्याना पाणी, अजारी असलेलेल्या औषध देण्याचं काम गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज यांनी केलं. हेच काम अलिकडच्या काळात कोणीतरी करतंय. भलेही ते महाराज नसतील, मात्र महाराजांपेक्षा कमी नाहीत असे सांगत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शेगाव येथे मंत्री शिंगणे, आ. लंके तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी शिंगणे यांनी आ. लंके यांची तोंड भरून स्तुती केली. डॉ. शिंगणे म्हणाले, कोरोना कळात अनेक आमदारांनी काम केले. मात्र २४ तास काम करणारे नीलेश लंके हेच एकमेव आमदार होते. ते राष्ट्रवादीचे आहेत याचा वेगळा आनंद मला आहे. निवडणूक आली की आपण सगळे एकमेकांविरोधात लढतो. मात्र शरद पवार यांना अभिप्रेत असणारे शाहू, फुले आंबेेडकर यांच्या विचाराचे काम आ. लंके करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल राज्याने, देशाने व जगानेही घेतली आहे.
आ. लंके यांनी तब्बल २० हजार रूग्णांना बरे केले आहेत. माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आले नाही की त्यांनी त्यासाठी कोणाकडे दोन पैशांची मागणी केली आहे. असा आमदार आमच्या जिल्हयात निवडूण आला तर राष्ट्रवादीचे तिन ते चार आमदार नक्कीच वाढतील. लंके यांच्या कामाचा अनुभव मी घेतला आहे. त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे आपल्या जिल्हयात कोणी काम केले तर पक्षाला निश्चित बळ मिळेल. कोणाकडे काही न मागता ज्यांनी निवडून दिले त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचे काम ते करतात. आमदारांनी केवळ रस्ते बांधले पाहिजेत, नाले बांधले पाहिजेत, धरणं बांधली पाहिजेत, पाणी योजना राबविल्या पाहिजेत असे नाही. सार्वजनीक विकासाच्या कामाचा तो भाग आहे. मात्र ज्यावेळी आपल्या भागातील माणूस खऱ्या अर्थाने अडचणीत येतो त्यासाठी सर्व काही झोकून देउन काम करणे हे लोकप्रतिनिधीचं काम असते. कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांची भिती घालविण्याचे महत्वाचे काम आ. लंके यांनी केले. रूग्णांना मानसिक अधार देण्याचे काम केले. रूग्णांवर उपचार तर केलेच परंतू त्यासाठी आ. लंके यांनी स्वतःला २४ तास वाहून घेतले. रूग्णांसमवेत जेवण करून प्रसंगी नाचून गाऊन त्यांनी लोकांना धिर दिला. आनंदी राहून कोरोनाची भिती बाळगू नका असे डॉक्टरही सांगतात.आ. लंके यांची जगाच्या पाठीवर दखल घेतली गेली. ते लोकांच्या मानातले हिरो झाले आहेत. मतदारसंघाबरोबरच जिल्हयातील राज्यातील तरूणांमध्ये त्यांची क्रेझ निर्माण झालेली आहे. हा माणूस आहे तरी कोण अनेक जण फोनवर बोलतात, भेटायला जातात, चर्चा करतात. एक रस्त्यावरचा सर्वसामान्य माणूस, सामान्यांच्या हाकेला ओ देउन त्यांच्या कामाला येणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. सगळया महाराष्ट्रात ही ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.