मलकापूर : बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १७ झाली आहे त्यात मलकापुर येथील रुग्णाचा समावेश आहे या रोगाचे संक्रमण होउ नये यासाठी ख़बरदारि घेतली जात आहे संपूर्ण मलकापुर शहर सील करण्यात आले आहे , शहरातील प्रत्येक मोहल्ला, रस्ता बंद करण्यात आला आहे. एका भागातील व्यक्ति दुसऱ्या भागात जाता कामा नये याची दक्षता घेतली जात आहे.
तसेच ठिकठिकाणी कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे खान्देश किवा मध्यप्रदेश मधून जिल्ह्यात येऊ नये येणाऱ्यांची पोलिस ठिकठिकाणी चौकशी करीत आहेत तसेच विनाकारण फिरणाऱ्याना चांगलाच धड़ा सुद्धा शिकवित आहेत.
previous post