शेगाव : तालुक्यातील माटरगाव बु येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे उशीरा शाळेत येण्याचे सत्र सुरूच आहे. वरिष्ठान्नी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकीकडे शाळा व्यवस्थापन समिती मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेसारख्या शासनाच्या विविध योजना राबवित असतांना याच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना मात्र मुलींबद्दल जिव्हाळा नाही, शिक्षणाबद्दल आपुलकी नाही. याचे जिवंत उदाहरण पालक वर्गाला व सदस्यला पाहाव्यास मिळाले. या अगोदर सुद्या काही पालकांनी शिक्षक व मुख्याध्यपक शाळेच्या वेळेत न येण्याच्या तोंडी तक्रारी केल्या होत्या. पण अशा कोणत्याच तक्रारीला न जुमानता मुख्याध्यापक व शिक्षक उशीरा येतांना कालही पाहवयास मिळाले.
काही सदस्य व पालकांनी उशीरा का आले असे विचारले असता शिक्षिकांनि आम्ही पण भीत नाही असे उत्तर दिले. अशा प्रकारचे बोलणे काही पालकांनी रेकॉडिंग सुद्धा केले आहे. असे मुख्याद्यापक व शिक्षकांचे वागणे म्हणजे गरीबाच्या मुलींच्या शिक्षणाला व क्षेत्राला लागलेले ग्रहण आहे. लहान मुलीच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा मुख्याध्यपक व शिक्षकांना आता ईश्वरच धडा शिकवेल यात शंका नाही. शिक्षकांच्या अशा वागण्यात बदल न झाल्यास शाळेची वेळच बदलावी, शिक्षकांच्या सोई नुसार शाळेची वेळ ठरवावी अशी मागणी पालक वर्ग व गावाकऱ्याकडून होत आहे. व ग्रामपंचायत ने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत ला थम मशीन लावून हजेरी घावी अशीही मागणी होत आहे.मुलांची व मुलींची दोन्ही शाळेचे१२ शिक्षक आहेत.पण एक ही शिक्षक स्थानिक मुख्यालय राहत नाही सर्व शेगांव व खामगांव येथुन अप डाउन करतात.