खामगांव : मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी 2 सप्टेंबर राेजी येथील हॉटेल तुळजाई मधील जिजाऊ सभागृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला-पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश टिकार, खामगाव नगर परिषद माजी नगराध्यक्ष गणेश माने तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय संघटक वनिता ताई अरबट, जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हाध्यक्ष रंजना ताई घिवे यांची उपस्थिती हाेती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊंचे पूजन करून जिजाऊ बिग्रेड च्या वतीने जिजाऊ वंदना गायली गेली. या कार्यक्रमात बाेलताना जिजाऊ सृष्टी व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाष कोल्हे म्हणाले की, युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 31 वर्षा आधी रोपटे लावले होते त्याच्या आता वटवृक्ष होत आहे हे पाहून आनंद होत आहे. मराठा सेवा संघाने गेल्या 31 वर्षांत समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. वैचारिक क्रांती घडवून महाराष्ट्रतील जातीय दंगली कमी झाल्या आहेत. महापुरुषांच्या विचाराने चालणाऱ्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ बिग्रेड ह्या संघटना आहेत.
सेवा संघाच्या माध्यमातून बहुजनांचा खरा इतिहास मांडण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. त्यामध्ये खामगाव येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सदानंद इंगळे, हॉटेल तुळजाई चे संचालक सदानंद टिकार, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई टिकार, माजी पंचायत समिती सभापती शितल ताई मुंडे, निर्भिड स्वराज्य चे अमोल गावंडे , कुणाल देशपांडे यांच्यासह विविध मान्यवरांचा पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे शिवचरित्र पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन महादेव सुकाळे, प्रास्ताविक रवींद्र चेके ,प्रमुख मार्गदर्शन सुभाषराव कोल्हे तर आभार संजय धोरण यांनी मानले. या कार्यक्रमाला नगरसेवक किशोर भोसले,चेतन धुमाळ,मोहनराव अरबट,सदानंद टिकार,रमेश टिकार,गणेश ताठे ,चेतन पाटील, रवींद्र चेके,वनिता ताई गायकवाड,सुधा ताई भिसे,सिमा ताई ठाकरे,अमर पाटील,विठ्ठल अवताळे,संतोष येवले यांच्यासह आदींची उपस्थिती हाेती.