आमसभेत सर्वानुमते जिल्हाध्यक्ष यांची निवड…
खामगाव-: मराठा सेवा मंडळ रजि.नं. ई-१२२ या मंडळाची वार्षिक आमसभा मराठा पाटील सभागृहात १३ जानेवारी २०२३ रोजी मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.सदानंद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यापूर्वी कार्यरत कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यासाठी सदरची आमसभा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची अभुतपुर्व उपस्थिती होती. त्यावेळी आमसभेमध्ये बहुमताने मराठा सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर लांजुडकर यांची निवड करण्यात आली.त्यावेळी मंडळाच्या आजपर्यंतच्या कार्यकाळाचाही आढावा घेवून भविष्यातील वाटचाल सुध्दा निश्चित करण्यात आली. त्यावेळी उपस्थित समाज बांधवांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव नरेंद्र शिंगोटे व आभार प्रदर्शन अनिल बोरोकार यांनी केले.प्रभाकर लांजुडकर यांच्या निवडीमुळे त्यांचे समाजात सर्वत्र अभिनंदन होत आहे.