खामगाव:-मराठा पाटील युवक समिती शाखा भोटा तसेच दृष्टी नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने भोटा येथे शिवजयंती निमित्त दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी मोफत कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया ,अल्पदरात चष्मे शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या सुरवातीला मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिबिराला सुरवात करण्यात आली.
यावेळी गजानन ढगे पाटील यांनी समितीच्या वतीने आयोजित विविध सामाजिक कार्याची उपक्रमाची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.शरद पाटील यांनी नागरिकांना डोळ्याचे आजार व त्याची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करून नागरिकांची कॉम्प्युटर द्वारे तपासणी केली. शिबिरा मध्ये भोटा गावातील 60 नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला . यामधील काही नागरिकांची अल्पदरात शस्त्रक्रिया दृष्टी नेत्रालय नांदुरा येथे करण्यात येणार आहे.नेत्र तपासणी ही नेत्र चिकित्सक डॉ शरद पाटील यांनी केली.यावेळी शिबीराला प्रमुख उपस्थिती मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे तसेच जलंब पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री धीरज बांढे साहेब ,pi श्री ताशकडे साहेब यांची होती.यावेळी युवक समितीचे प्रफुल्ल मुंढे, जिल्हा संघटक अविनाश कुटे,शहराध्यक्ष विध्यार्थी समिती राम पारस्कार, प्रतीक मिरगे, यांची उपस्थिती होती. शाखेतील बळीराम पारस्कार, रामहरी पारस्कार, शुभम खराटे, वैभव पारस्कार,योगेश पारस्कार, ऋषिकेश पारस्कार सह गावकरी मंडळी उपस्थित होती.