April 11, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा नांदुरा बुलडाणा मलकापूर सामाजिक

मराठा पाटील युवक समिती च्या वतीने शाखा डोलारखेड येथें मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

मराठा पाटील युवक समिती शाखा डोलारखेड तसेच दृष्टी नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने डोलारखेड येथे दि. 7 जानेवारी 2022 रोजी मोफत कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया ,अल्पदरात चष्मे शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या सुरवातीला मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिबिराला सुरवात करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना

यावेळी गजानन ढगे पाटील यांनी समितीच्या वतीने आयोजित विविध सामाजिक कार्याची उपक्रमाची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.शरद पाटील यांनी नागरिकांना डोळ्याचे आजार व त्याची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करून नागरिकांची कॉम्प्युटर द्वारे तपासणी केली. शिबिरा मध्ये डोलारखेड गावातील 92 नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला .यामधील काही नागरिकांची अल्पदरात शस्त्रक्रिया दृष्टी नेत्रालय नांदुरा येथे करण्यात येणार आहे.नेत्र तपासणी ही नेत्र चिकित्सक डॉ शरद पाटील यांनी केली.यावेळी शिबीराला प्रमुख उपस्थिती मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांची होती.यावेळी जिल्हा संघटक अविनाश कुटे,शहराध्यक्ष विध्यार्थी समिती राम पारस्कार, रवि ताठे,विठ्ठल वडोतकार, सुपडा देठे, शिवाजी देठे, ज्ञानेश्वर देठे, श्रीराम देठे, गोपाळ देठे, सागर देठे, परमेश्वर देठे, योगेश देठे, मंगेश देठे, आशिष देठे, अभिषेक देठे, रोशन देठे,तसेच शाखेतील सह गावकरी मंडळी उपस्थित होती.

Related posts

आ. संजय कुटेंच्‍या वाहनावर दगडफेक, आता पुन्‍हा वाद पेटला..!

nirbhid swarajya

सर्वांची माफी माग, नाही तर तुला…; पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालणाऱ्या नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

nirbhid swarajya

अवैधरित्या रेल्वेचे तात्काळ तिकीट बनविणाऱ्या सायबर कॅफेवर रेल्वे पोलिसांची धाड

nirbhid swarajya
error: Content is protected !!