April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा सामाजिक

मराठा पाटील युवक समितीच्या ६६ व्या शाखेचे देऊळगाव साकर्शा येथे अनावरण

खामगाव:-मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते दि. 30 जानेवारी रविवार रोजी देऊळगाव साकर्शा ता.मेहकर येथे शाखा नामफलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली या नंतर गावातील नागरीकांना वतीने उपस्थीत समितीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .यानंतर मोताळा तालुका अध्यक्ष देविदास चोपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,तसेच डॉ दीपकजी पाचपोर यांनी सुद्धा समितीच्या उपक्रम बद्दल मार्गदर्शन केले,तसेच शाखेतील ज्ञानेश्वर पाटील यांनी समिती च्या बद्दल असणारी भावना व्यक्त केलीन तसेच गावातील गजानन पाटील यांनी सुद्दा आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांनी युवक समितीच्या कार्याची सविस्तर माहिती देऊन युवकांना संघटीत होण्याचे आवाहन करून युवकांनी उच्चशिक्षित होऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले यावेळी सूत्र संचालन सुनील पाटील सर यांनी केले.तसेच आभारप्रदर्शन कैलास पाटील यांनी केले. सदर प्रसंगी मेहकर तालुका अध्यक्ष पदी कैलास पाचपोर यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यांना संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ ढगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी समितीचे संस्थापक कार्यकारिणी सदस्य सतीश सोळंके, राजू पाटील ,प्रसिद्धी प्रमुख अमोल गावंडे,माजी जिल्हाध्यक्ष डिगांबर बोके,ऍड. जयंत पाटील खरसने,जिल्हा संघटक अविनाश कुटे,खामगाव तालुका अध्यक्ष मोहन घुईकर,मोताळा तालुका अध्यक्ष देविदास चोपडे,रुग्णसेवा समिती उपाध्यक्ष अनंता साबे,खामगाव तालुका उपाध्यक्ष श्रीहरी टिकार,गजानन भुसारी, तालुका सचिव ज्ञानेश्वर महाले,तालुका संघटक सागर मुयांडे,श्रीधर टिकार,सुधीर टिकार,खामगाव शहराध्यक्ष मुन्ना पेसोडे, विद्यार्थी समिती खामगाव शहराध्यक्ष राम पारस्कार, कार्याध्यक्ष रवी मिरगे, उपाध्यक्ष विठ्ठल वडोतकार,यांची उपस्थिती होती.यावेळी मराठा पाटील युवक समिती शाखा देऊळगाव साकर्शा कार्यकारिणीमध्ये शाखा अध्यक्ष ,,विजय पचपोर उपाध्यक्ष ,गोपाळ पाचपोर ,सचिव समाधान पाचपोर ,कार्याध्यक्ष महादेव पाचपोर प्रसिद्धी प्रमुख किसना पाचपोर,संघटक ,हिम्मत पाचपोर,,तसेच संदीप पाटील, गजानन पाटील, संतोष पाटील, ग्राम पंचायत सदस्य गणेश पाटील,स्वामी पाटील,रामचंद्र पाटील, पोलीस पाटील गजानन पाटील, नितीन पाटील ,सतीश पाटील ,प्रमोद पाटील ,अजय पाटील,अविनाश पाटील ,बबलू पाटील,माणिक पाटील सह गावातील बहुसंख्य जेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते

Related posts

बोगस बियाणे विक्री प्रकरणी आरोपींना कोठडी

nirbhid swarajya

शेगाव नगरपालिकेवर दगडफेक ; कर्मचाऱ्यांनी थांबवले कामकाज

nirbhid swarajya

६५ वर्षीय वृध्द महिलेचा गळा दाबून खून,उमरा-लासूरा येथील घटना…

nirbhid swarajya
error: Content is protected !!