खामगांव : मराठा पाटील युवक समिती शाखा लांजुळ तसेच दृष्टी नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने लांजुळ येथे दि.18 सप्टेंबर 2021 रोजी मोफत कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया, अल्पदरात चष्मे शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या सुरवातीला मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी गजानन ढगे पाटील यांनी समितीच्या वतीने आयोजित विविध सामाजिक कार्याची उपक्रमाची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.शरद पाटील यांनी नागरिकांना डोळ्याचे आजार व त्याची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करून नागरिकांची कॉम्प्युटर द्वारे तपासणी केली. शिबिरा मध्ये ३५२ नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. यामधील काही नागरिकांची अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नेत्र तपासणी ही नेत्र चिकित्सक डॉ शरद पाटील यांनी केली. यावेळी शिबीराच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ उषा विठ्ठल थेरोकार प्रमुख उपस्थिती मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांची होती. तसेच युवक समिती कार्यकारिणी सदस्य सतीश सोळंके ,सुनील पाटील जिल्हा संघटक अनंता वसंतराव धामोडे, दृष्टी नेत्रालयाचे अतुल पाटील,जिल्हा संघटक अविनाश कुटे,
खामगाव तालुका अध्यक्ष मोहन घुईकर, विद्यार्थी समिती शहराध्यक्ष राम पारस्कार, विद्यार्थी समिती सचिव विठ्ठल वडोतकार, लांजुळ चे उपसरपंच राम अंभोरे,ग्रामसेवक राजेंद्र निर्मळ,समाधान पाटील ,सचिन जैस्वाल, जगन्नाथ सुलतान, रसूल शा, विठ्ठल थेरोकार, रामेश्वर इंगळे, पुंडलिक टाले, ग्रामपंचायत सदस्य बाळू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र निंबाळकर, दीपक अंभोरे, मंगेश देशमुख, डिगांबर थेरोकार, उमेश जैस्वाल, राजू धामणकर, सूर्या कापडे,सुश्रुत अंबुळकर, श्रीकृष्ण कळस्कार, किसना काकड, तसेच मराठा पाटील युवक समिती शाखेचे महेश पाटील,वैभव पाटील,पवन पाटील,गजानन पाटील,ज्ञानेश्वर पाटील,अक्षय पाटील, ज्ञानेश्वर हिवाळे,श्यामा गावंडे, यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती.