नांदुरा : सद्ध्या आरक्षणाच्या नावावर मराठा समाजाची थट्टा करणाऱ्या सरकार व न्यायव्यवस्थेला मराठा समाजाच्या वतीने तीव्र इशारा देण्यात आला आहे. जर लोकशाहीच्या मार्गाने आमचा हक्क आम्हाला मिळत नसेल तर आक्रमक भूमिका घ्यायला आता मराठा समाज मागे सरणार नाही. मुळात आरक्षणाची सुरुवात ही छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे एका मराठा राजाने गरीब शोषित वर्गासाठी केली होती. त्याकाळी मराठा समाज सर्व बाजूने सक्षम होता. पण आज ती परिस्थिती राहिली नसून आज खरी आरक्षणाची गरज मराठा समाजाला आहे. आणि ते आमच्या हक्काचं आहे अन् कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते मिळवणार मग यासाठी उभे सरकार पडायचे काम पडले किंव्हा आणखी काही उद्रेक करावा लागला तरी चालेल. शांत मराठे पाहिले आता त्यांचा लढाऊ बाना पाहा अशी भूमिका आज संतप्त मराठा समाजाने घेतली आहे. आज दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाजाच्या वतीने वरील आशयाचे निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहे.यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा जनसागर तहसील कार्यालयात उपस्थित होता.