नांदुरा:आंध्रप्रदेश येथून नांदुरा आलेले मोहनराव हे ना फक्त यशस्वी उद्योजक झाले सोबतच समाजसेवेचा नाव आदर्श समाजासमोर ठेवला.विश्वातील सर्वांत मोठी हनुमान मूर्ती त्यांनी स्थापन केली व शहराचे नाव देशात मोठे केले.श्री तिरुपती बालाजी संस्थान स्थापन करून त्या माध्यमातून मोहनराव नारायणा नेत्रालय स्थापन करून त्यामाध्यमातून मोफत व अत्यल्प दरात डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया सुरू करून हजारो लोकांना हे जग स्वतःच्या डोळ्याने स्पष्ट पाहण्याचे भाग्य श्री मोहनराव यांच्यामुळे मिळाले.आंध्रप्रदेशातील श्री तिरुपती बालाजी संस्थान सारखी हुबेहूब प्रतिकृती नांदुरा सारख्या लहान शहरात निर्माण करून नांदुरा शहराचे नाव लौकीक केले.एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी मरणोपरांत देहदान करून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला.यातून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार.मरणानंतरही समाजाचे हित जोपासणारे हे मनान व्यक्तिमत्त्व नांदुरा शहरात कर्मभूमी मधे अनंतात विलीन झाले.वयाच्या ७२ व्या वर्षी दिनांक २९ मे २०२२ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.मारो पण कीर्ती रुपी उरो या म्हणी प्रमाणे मोहनराव अमर झाले.