बुलडाणा -अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मन नदीच्या पात्रात आज सकाळी एका ६५ वर्षीय इसमाचे प्रेत नदीत तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक इसम हा बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाला या गावाचा असल्याचे समजते. हि हत्या की आत्महत्या हे गुढ अद्याप अस्पष्ट आहे. शेगाव पासून ७ किमी वॉर असलेल्या लोहारा गावाजवळील मन नदीपात्रात कवठा बॅरेजमुळे पाणीसाठा केलेला असुन या नदिपात्रात लोहारा पुलाजवळ आज २३ फेब्रुवारी रोजी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगतांना नागरीकांना दिसून आला.सदर मृतदेहाची ओळख दुपार पर्यंत पटली नव्हती. घटनेची माहीती कळताच ऊरळ चे ठाणेदार संजिव राऊत, बिट जमादार संजय वानखडे , यांनी घटनास्थळी गाठीत प्रेत पाण्याबाहेर काढुन ऊत्तरीय तपासणीकरीता शेगाव येथील सईबाई मोटे रूग्णालयात पाठवीण्यात आले आहे. अज्ञात मृतदेहाची ओळख पटवीण्याचे काम ऊरळ पोलीस करीत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सोनाला या गावातील गजानन भगवान अंभोरे वय ६५ म्हणून ओळख पातळी असून मृतक इसम हा मागील ३ दिवसांपासून घटून बेपत्ता असलयाचे समजते.सदर ईसमाने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली यामागचे गुढ ऊकलण्याचे मोठे आव्हान ऊरळ पोलीसांसमोर आहे.