October 6, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय सामाजिक

मनसे न.प. घंटागाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा

खामगाव : नगर परिषद खामगांव अंतर्गत खामगांव शहरातील कचरा उचलण्याचा ठेका मे. डी. एम. एंटरप्राईजेस पुणे या कंपनीने घेतला असून खामगांव शहरात या कंपनीत काम करणार्‍या बहुतांश कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारलेले आहे. खामगांव येथील डी. एम. एंटरप्राईजेस मध्ये काम करणार्‍या कामगारांनी त्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्याकरीता मनसे कामगार सेनेच्या वतीने कंपनीच्या वरिष्ठांशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील आजपर्यंत नगर परिषद, खामगांव किंवा डी. एम. एंटरप्राईजेस यांचे वतीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. दिवसेंदिवस कामगारांच्या समस्या वाढतच चालल्या असून त्या सोडविण्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अंतर्गत असलेल्या नगर परिषद घंटागाडी कर्मचारी संघटना (डी. एम. एंटरप्राईजेस, खामगांव) चे शहर अध्यक्ष विक्की भिकाजी शिंदे यांनी या बाबत आवाज उचलला असून येत्या ७ दिवसात न.प. खामगांव व डी. एम. एंटरप्राईजेस यांचे वतीने कामगारांच्या विविध समस्या बाबत चर्चा करून त्या निकाली काढण्यात आल्या नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे दिला आहे.

सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, बुलडाणा, मुख्याधिकारी, न.प.खामगांव आणि इतर संंबंधीतांना देण्यात आल्या असून आता या निवेदनाची दखल घेत न.प.चे अधिकारी आणि डी. एम.एंटरप्राईजेसचे वरिष्ठ हे मनसे कामगार सेनेच्या प्रमुखांशी चर्चा करून कामगारांच्या समस्या निकाली काढण्यास सहकार्य करतात की कामगारांना वार्‍यावर सोडून त्यांना काम बंद आंदोलन करण्यास भाग पाडतात याकडेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना घंटागाडी कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी विकी शिंदे, विनोद इंगळे, रुपेश आठवले, अमित हट्टेल ,शिवदास घोगरे ,संजय भवर ,संजय सरकटे, विनोद सुकाळे, नाना पिंपळे, सागर बोराखडे, आकाश शिंदे, निलेश बोराडे ,श्याम मरपल्ली, अनिरुद्ध चेंडाळणे, दीपक लटके, अभय सावरे, शुभम जिरंगे, निखिल मांगले, योगेश राऊत ,प्रभाकर गलांडे, सुर्यकांत खंडारे, विवेक भारसाकळे,उपस्थित होते.

Related posts

माझ भाग्य़ आहे की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करुन माझा वाढदिवस साजरा करीत आहे – ॲड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

45 वर्षीय इसमाची विहिरित उडी घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya

लॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली

nirbhid swarajya
error: Content is protected !!